मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
“महाविकास आघाडी सरकार 2022 मध्ये सरकार कोसळण्याआधी आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची योजना होती. एखाद्या प्रकरणात गुंतवून त्यांना अटक करण्याचा डाव होता. तसंच 2024 च्या निवडणुकीसाठी आमदार फोडण्याची योजना आखण्यात आली होती,” असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
शिवसेना राज्यातील 16 जागा लढणार आहे. यामध्ये मुंबईतील 3 जागांचा समावेश आहे. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरुन कोणताही वाद नाही. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही 2019 मधील 42 जागांचा रेकॉर्डही यावेळी मोडू असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसंच उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना आपण कोणतीही ऑफर दिली नसल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.