नागपूर (वृत्तसंस्था) रामटेक मोटारपंप सुरू करताना जोरात विजेचा धक्का लागून ७७ वर्षीय वृद्धाचा निवासस्थानी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. दुष्यंत सीताराम चौकसे (रा. मनसर) असे मृतकाचे नाव आहे.
दुष्यंत चौकसे हे ११ सप्टेंबरला सकाळी दहा वाजता घरातील पाण्याची टाकी भरण्याकरिता मोटारपंप सुरू करण्याकरिता गेले. परंतू मोटारीच्या पंपचे बटण पावसामुळे ओले होते. यामुळे चौकसे यांनी बटणला हात लावताच त्यांना जोरदार धक्का लागला व ते जागीच कोसळले. त्यांना कुटुंबीयांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.