अमळनेर (प्रतिनिधी) देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल येथे हिंदी दिनाचे औचित्य साधून वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
व्यासपीठावर मुख्याध्यापक अनिल महाजन, जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के, एस.के.महाजन, एच.ओ.माळी होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे शिक्षक एच.ओ. माळी होते. अगोदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व अतिथी यांनी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले. इयत्ता आठवी ते दहावीतील ४० विद्यार्थ्यांनीं निबंध स्पर्धेत सहभाग नोंदवला. उत्कृष्ट निबंधाला एका कार्यक्रमात सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. हिंदी दिनाचे औचित्य साधून आठवी ते दहावीतील १० विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाचे महत्त्व व आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनीं कविता गायन केल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी विभाग प्रमुख आय आर महाजन यांनी केले. हिंदी दिनाचे औचित्य साधून शाळेत वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम इयत्ता १०वी तील विद्यार्थ्यांनी यशस्वी पाटील, द्वितीय नववीतील विद्यार्थिनी भाग्यश्री पाटील, तृतीय इयत्ता दहावीतील शिवम पाटील उत्तेजनार्थ आठवीतील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
अध्यक्षीय भाषणात शिक्षक एच.ओ.माळी म्हणाले की, हिंदी भाषा प्रचार व प्रसाराचे महत्त्वाचे माध्यम आहे. हिंदी भाषेमूळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कवी कुमार विश्वास, काँमोडियन कपिल शर्मा यांना विशेष लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनीं इतर भाषाप्रमाणे हिंदी भाषा बोलली पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ईश्वर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस.के.महाजन यांनी केले.