TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दसरा मेळाव्यासाठी शिवसेना – शिंदे गटाचे “शिवसेना स्फूर्तीगीत” झाले रिलीज !

पाणीपुरवठामंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांची संकल्पना

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : शिवसेनेचा (शिंदे गट) दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असून या मेळाव्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या मेळाव्याची उत्सुकता केवळ राज्यात नसून देशभरात आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गटाचे नेते आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून या मेळाव्यासाठी खास शिवसेना स्फुर्तिगीत तयार करण्यात आले आहे. आज हे गीत सर्वासाठी रिलिज करण्यात आले. “हे गीत म्हणजे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या महान जीवनकार्याला निष्ठावंत शिवसैनिकानं अंतःकरणातून दिलेली मानवंदना आहे. इतकंच नव्हे तर बाळासाहेबांचा शिवधर्माचा, हिंदुत्त्वाचा वारसा पुढे नेण्याचं वचन आहे, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी या गीता बद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.

या गीत अनावरण प्रसंगी शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे तसेच या गीताची निर्मिती करणारे प्रभारंग फिल्म्स्, पुणेचे संचालक संदिप पांडुरंग माने, उर्मिला चोपडा – हिरवे, शरद डहाळे आदींची उपस्थिती होती.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

काल शिवसेना (ठाकरे) गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आनंद शिंदे यांना घेऊन त्या गटाचे गाणे तयार करण्याची चर्चा सुरू असतानाच आज थेट गाणे लाँच करून दोन गटात सुरू असलेल्या टीझर वॉरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. ‘आम्ही शिवबाचे धारकरी. शिवसेनेचे मानकरी’ अशा ओळी असलेले हे गाणे शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेनुसार ‘प्रभारंग फिल्म्स् यांनी तयार केले असून आदर्श शिंदे यांनी ते गायले आहे.

या वेळी बोलताना शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, ” या गीताच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवधर्माचा, हिंदुत्त्वाचा वारसा पुढे नेण्याचं वचन आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी मुलखात स्वराज्याचं बीज पेरलं, त्याच ध्यासानं बाळासाहेबांनी मराठी मनांत स्वाभिमानाची ज्वाला पेटविली. शिवकाळापासून अखंड चालत आलेल्या स्वराज्य पालखीची धुरा घेऊन साहेबांनी सुवर्ण इतिहास लिहिला. या पालखीला आपल्या खांद्यावर घेऊन शिवसेनेचा प्रवास सुरू झाला. अन् संकटांच्या वादळातही शिवनीती टिकविण्याचं आव्हान बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांनी पेललं. शिवसेनेचा हाच धगधगता प्रवास हे या स्फूर्तीगीताचं प्रेरणास्थान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांचा हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहोत. उद्या बीकेसी येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे स्फूर्तीगीत लाँच करत आहोत. आम्ही शिवसेनेचे मानकरी असं अभिमानानं म्हणताना प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यात आनंद असेल. अन्
शिवसेनेचा भगवा झेंडा मिरवण्यासाठी त्याला आणखी बळ मिळेल!” या शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली. निर्माते संदीप माने, कार्यकारी निर्मात्या उर्मिला हिरवे, गीतकार संतोष सातपुते, संगीतकार पार्थ उमराणी, एडिटर सत्यजित पाटील, शरद डहाळे या टीम ने अत्यंत कमी वेळेत हे गीत तयार करण्याचे आव्हान पूर्ण केले.

प्रभारंग फिल्म्स् चे संचालक संदिप माने म्हणाले, “शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी या गीताची संकल्पना मांडली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे शिवरायांनी दाखवलेल्या स्वराज्य मार्गावरून करोडो माणसांना सोबत घेऊन निघाले. भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हे गीत तयार करताना हेच सूत्र ‘प्रभारंग फिल्म्स’च्या टीमच्या ध्यानीमनी होते. गायक आदर्श शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजाने या गाण्यात अनोखा जोश निर्माण केला आहे. प्रत्येक शिवसैनिकाला आपलंसं वाटणारं, तना-मनात चैतन्य फुलवणारं हे स्फूर्तीगीत आहे. यातील ‘शिवसेनेचे मानकरी’ ही उपमा प्रत्येक शिवसैनिकाला सुखावणारी आहे. या गीतातून आदरणीय साहेबांचा अनुकरणीय प्रवास नि कोटी कोटी शिवसैनिकांच्या मनी असलेले त्यांच्या साहेबांबद्दलचे प्रेम, आदर आणि निष्ठा अधोरेखित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

धरणगाव तहसीलदारांची पत्रकाराला दिलेली नोटीस म्हणजे हायकोर्टाची अवमानना : जितेंद्र महाजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग : अमळनेर तालुक्यातील ग्रामसेवकाला २५ हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक !

January 23, 2023

खळबळजनक : भुसावळ येथील नववीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात आढळले गावठी पिस्तुल !

June 17, 2023

‘बीएचआर’ घोटाळा : कंडारे, झंवरसह इतरांची मालमत्ता सील होण्याची शक्यता !

November 28, 2020

आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत ; मुंबई उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

November 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group