धरणगाव (प्रतिनिधी) येथील तेलाठी गल्लीत २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान श्रावण मासनिमित्त संगीतमय आयोजित शिव महापुराण कथेची नुकतीच सांगता झाली आहे.
भागवताचार्य मेघनाथ महाराज ठाकरे यांच्या सुरेल अमृतवाणीतून ही कथा ऐकण्याची संधी भाविकांना मिळाली. या कथेला गायनाचार्य शंभू महाराज चव्हाण, दयाराम महाराज, तबलावादक प्रकाश महाराज अहिरे, ऑर्गन वादक कैलास महाराज तसेच वेशभूषा कार सुधीर महाराज यश ठाकरे यांच्या सहभाग होता. तसेच शंकर पार्वतीचे पात्र शरद चौधरी व सोनाली चौधरी, गणपतीचे पात्र गोपाल चौधरी, नारदचा भूमिका अवधुत चौधरी हिमालय राजाची भूमिका दत्तात्रय चौधरी, मैनावतीचा भूमिका मिनाबाई चौधरी यांनी केला.
दैनंदिन रात्री ८:३० ते १० या वेळेत कथेला हजारो भाविकांनी हजेरी लावली व कथा श्रवण केली. तसेच दररोज होणाऱ्या आरतीचे मानकरी हे गावातील 55 विविध समाजातील प्रतिनिधी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच ४ सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी ४ वाजता रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली. त्यात विराजमान भागवताचार्य मेघनाथ ठाकरे महाराज तसेच शंकर पार्वती यांचा सजीव देखावा, कळशधारी महिला होत्या.
मिरवणुकीची सुरुवात सिध्दी हनुमान मंदिर- कासार गल्ली गुजराती गल्ली- श्री राम मंदिर- भावे गल्ली- जैन गल्ली- मेन रोड- कोट बाजार असा मार्ग होता. सिद्धी हनुमान मंदिर जवळ सांगता करण्यात आली. हजारो भाविकांनी ग्रंथाचे सुद्धा दर्शन घेतले. या संपुर्ण संगितमय शिव महापुराण कथेचे आयोजन नारी शक्ती, स्त्री शक्ती महीला मंडळाच्या वतीने करण्यात आले. महीला मंडळानी सहभागी सर्व भाविकांचे आभार मानले.