बोदवड (प्रतिनिधी) एणगाव हायस्कूलच्या माजी विद्यार्थींनी वनिता ज्ञानदेव बोंडे यांनी इ. ९ व इ.१० वी च्या मुलींसाठी जवळपास ८० सॅनिटरी पॅड देण्याचा स्तुत्य कार्यक्रम हाती घेतला आहे. या पॅडचे वाटप एणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ.प्राजक्ता सोनवणे,सरपंच अन्नपूर्णा कोळी,वनिता बोंडे यांच्या आई लक्ष्मीबाई ज्ञानदेव बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
वनिता बोंडे यांनी शाळेचे मुख्याध्यापक डॉ पी. एस. गड्डम सर यांच्याशी विद्यार्थींनिंच्या शारीरिक बदलांच्या काळात त्यांना होणारा ञास, काळजी,व सुरक्षितता यासंदर्भात चर्चा केली.मुख्याध्यापक यांनी या उपक्रमाला होकार दिला व त्या संदर्भात मार्गदर्शन करण्याठी एणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ.प्राजक्ता सोनवणे यांना आमंत्रित करून विद्यार्थींनींना मासिक पाळी मध्ये घ्यावयाची काळजी बद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात वनिता बोंडे यांच्या आई लक्ष्मीबाई ज्ञानदेव बोंडे यांचा सत्कार आर.के.भंगाळे (मॅडम) यांनी शाळा व शाळा प्रशासन यांच्या वतिने केला.तसेच एणगाव गावच्या सरपंच अन्नपूर्णाताई विनोद कोळी यांनी डॉ.प्राजक्ता सोनवणे यांचा सहृदय सत्कार केला. आपण समाजाला काहीतरी देऊ लागतो अशी भावना असली तर आपल्याकडून काहीनाकाही चांगलं काम घडतंच. पुण्यात स्थायिक असलेल्या योगशिक्षिका गौरी पाटील तथा पूर्वाश्रमीच्या एणगांव येथील वनिता ज्ञानदेव बोंडे यांनी असाचा एक स्तुत्य उपक्रम केलाय.ही बाब अभिमानास्पद असल्याचे सरपंच सौ.कोळी यांनी सांगितले. यावेळी डॉ. प्राजक्ता सोनवणे यांनी मासिक पाळी व स्वच्छता याबाबत उपस्थित विद्यार्थिनींना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका रेखा भंगाळे यांनी केले.