चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एसएनआरजी इंग्लिश मेडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचे सादरीकरण वाळकी या गावात सादर केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम सादर केले त्यात नाटिका कर्माचे फळ, कृतियुक्त संवाद, आपले मदतनीस यासह विविध कलाविष्कार नर्सरी ते 6 वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केले . यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते यात ज्ञानेश्वर शालिक मोरे, अमिता योगेश यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला यांनी मुलांचे कौतुक केले. शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेबद्दल व आपल्या पाल्याच्या शिक्षणाबद्दल सकारात्मक अभिप्राय दिला. कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कल्पेश साळुंके सर यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्या जेनिफर साळुंके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या जेनीफर साळुंके, कल्पेश साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी दाभाडे, शुभांगी पारधी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.