चोपडा (प्रतिनिधी) चोपडा तालुका पत्रकार संघातर्फे ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान व गौरव सोहळ्याचे आयोजन दिनांक २० मार्च रोजी नगरपरिषद नाट्यगृह चोपडा येथे केले आहे.
एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन चोपडा तालुका पत्रकार संघाने केले असून राज्य स्तरावरील विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या २५ महिलांना सुप्रसिद्ध निवेदिका व लेखिका सौ मंगलाताई खाडीलकर मुंबई यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, भाजपा महिला मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व गोदावरी फाउंडेशन च्या संचालिका डॉ.केतकीताई पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
दि.२० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीमती आक्कासाहेब शरदचन्द्रिका सुरेश पाटिल नाट्यगृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. तरी जास्तीत जास्त महिला व पुरुषांनी कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन चोपड़ा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लतिश जैन, उपाध्यक्ष नंदलाल मराठे, सचिव विलास पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी केले आहे.