जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जळगाव शहरामधील महिलांनी मनसेत प्रवेश केला आहे.
सपना सिताराम कुमावत, शकुंतला पाटील, यमुनाबाई सिताराम कुमावत, माया महेश मार्कंड, दिपाली गुरव, कांताबाई सुधाकर बाविस्कर, सुरेखा प्रमोद गुरव, यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आज संध्याकाळी प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे यांनी सदर महिलांचे स्वागत केले. जळगाव शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महिलांचे मोठं संघटन करण्याबाबत महिलांनी निर्धार केला असून लवकरच संपूर्ण शहरभर महिला सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.