धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) येथील झिपरु तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग पाटील जुनियर कॉलेजात विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीची स्थापना विद्यालयात करण्यात आली. या इको-फ्रेंडली गणेशाची स्थापना विद्यालयाचे चेअरमन प्रदिप विष्णु महाजन व सौ.सुवर्णा महाजन यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.
विद्यालयात बसविण्यात आलेल्या शाडू मातीपासून तयार केलेल्या इको-फ्रेंडली गणेशाची निर्मिती विद्यालयातील माजी विद्यार्थी व नव नियुक्त पोलिस पाटील रवींद्र कोळी व इयत्ता १० वीचे विद्यार्थी यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून मूर्ती बनविण्याचे धडे देत गणेश मुर्ती तयार करण्यास शिकवले. बहुतांशी विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्तींचे स्थापना आपल्या घरी केली असून विद्यालयात देखील शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशाची स्थापना करण्यात आली असुन या द्वारे विद्यार्थांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठीचा प्रयत्न करण्याचा संदेश देत गणेशाची स्थापना केली.
इको फ्रेंडली गणेशाची स्थापना केल्याबरोबरच विद्यार्थ्यांनी नुकतेच यशस्विरित्या चंद्रावर लँड झालेल्या चंद्रयान ३ चे उभेउभ माँडेल करत विज्ञानाची प्रगती याविषयावर भर देत उत्कृष्ट आरास व्दारे भारताच्या कर्तुत्वाचा संदेश दाखवण्याचा प्रयत्न विद्यार्थांनी आपल्या आरसातून व्यक्त केला आहे.यासाठी विद्यार्थांना मातोश्री गँरेजचे संचालक प्रताप महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थांना लाभले.विद्यालयाचे चेअरमन प्रदिप महाजन ,इंग्लिश मेडिअम स्कुलचे चेअरमन जगदिश पाटील,अनंत पाटील,पंकज महाजन,पर्यवेक्षक नवल महाजन,जेष्ठ शिक्षक वासुदेव महाजन,व्हि.डी.कोष्टी,एस.सी.पाटील,साै.पुनम पाटील,कुलदिप महाजन,संतोष कोळी,राजेंद्र पाटील,देविदास कोळी, विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाडू मातीपासून मूर्ती तयार करणे व आरास चंद्रयान ३ संबधी सजावटीसाठी इयत्ता दहावीचे व सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलेत.