जळगाव (प्रतिनिधी) शहरामध्ये पिंक ऑटो भगिनींची संख्या वाढत असून पिंक आटो भगिनींच्या रिक्षा विषयी असलेल्या विविध प्रकारच्या समस्या, परिवहन कार्यालयातील विविध कामे, शहर वाहतूक कार्यालयात समन्वय साधने, याकरता असोसिएशनची गरज होती.
शहरातील पिंक आटो भगिनींनी एकत्र येऊन पिंक ऑटो ची संकल्पना मांडणारे व प्रत्यक्षात उतरवणारे ॲड.जमील देशपांडे यांची एकमताने पिंक ऑटो रिक्षा असोसिएशन पदी एकमताने निवड केली.तर सचिवपदी रंजना सपकाळे यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारणी खालील प्रमाणे !
उपाध्यक्ष संगीता बारी,सहसचिव पोर्णिमा कोळी,सदस्य मीना कोळी, पूनम गजरे, माधुरी भालेराव माधुरी निळे मनीषा कोळी,नीता ठाकरे ई. लवकरच पिंक ऑटो चालक भगीणींचा मेळावा घेण्यात येणार असून त्यांना रिक्षा व्यवसायासंदर्भात परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, वाहतूक कार्यालयाला भेट, परिवहन कार्यालयाला भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे.