ठाणे (वृत्तसंस्था) महिला साडी, सलवार सूटमध्ये तर चांगल्या दिसतातच. पण माझ्यासारखे त्यांनी काही नाही घातले तरी त्या छान दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन शुक्रवारी ठाण्यातील हायलँड भागात करण्यात आले होते. या संमेलनास अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यावेळी बाबा रामदेव हे महिलांशी संवाद साधत होते. यावेळी रामदेव बाबा म्हणाले की, अमृता फडणवीस यांना व्यायमाचा इतका चार्म आहे की, त्यांना इतकी आवडय की, त्या शंभर वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण त्या खूप तोलून-मोजून खातात. आनंदी राहतात. जेव्हा पाहावे मुलासारख्या हासत राहतात. जसे हास्य अमृताजींच्या चेहऱ्यावर असते, तसेच हास्य मी तुमच्या चेहऱ्यावर पाहू इच्छितो. यानंतर मात्र, रामदेव बाबा यांची जीभ घसरली. महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले.