भुसावळ प्रतिनिधी । शहारातील डेली मार्केट बाजारात गेलेल्या वयोवृद्ध व्यक्तीची गाडी मिळत नसल्यामुळे त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीसा स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलीसांनी काही तासातच ‘त्या’ व्यक्तीची गाडी शोधून दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अविनाश वासुदेव पुरानिक (वय – 69 रा.राजेश्वर नगर भुसावळ) हे आज (दि.११) रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास डेली मार्केट मधील बाजारात गेले असता त्यांच्या स्वताच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची प्लेझर लाल रंगाची गाडी ( MH 19 BH 6384) क्रमांकाची असलेली ही कुठे तरी लावुन ते विसरुन गेले तेव्हा त्यांनी खुप शोधा शोध केली परंतु ती मिळाली नाही त्यांचा लक्षात पण येत नव्हत की त्यांनी गाडी कुठे लावली तेव्हा त्यांना वाटल की आपली गाडी कोणी तरी चोरुन नेली ते भु.बा.पेठ पो.स्टेला आले व घडलेला प्रकार सांगितला.
तेव्हा भु.बा.पेठ पो.स्टे चे मा.पो.नि.सो दिलीप भागवत यांनी सर्व घडलेला प्रकार आईकला व लागलीच DB पथकातील पो.कॉ.कृष्णा देशमुख व पो.कॉ.ईश्वर भालेराव यांना तात्काळ गाडीचा शोध घेण्यासाठी त्यांच्या सोबत पाठवले तेव्हा वरील या दोन्ही पो.कर्मचारीयांनी अविनाश पुरानिक यांना व्यवस्थित विचारपुस केली व डेली बाजारात त्यांचा सोबत जावुन गाडीचा शोध घेताला तेव्हा दोन ते तीन तासा नंतर गाडी मिळाली व त्यांच्या ताब्यात दिली. सदर कारवाई ही मा.पो.नि.सो दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.कृष्णा देशमुख व पो.कॉ.ईश्वर भालेराव यांनी केली.















