TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनेकांनी चाळीसगावकरांची फसवणूक केली, माझा मात्र विकासाचा अनुशेष भरून काढायचा संकल्प : आमदार मंगेश चव्हाण !

शहरातील तितूर नदीवरील मोठ्या पुलाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न !

vijay waghmare by vijay waghmare
July 9, 2024
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असणाऱ्या चाळीसगाव शहराची गेल्या काही दशकांपासून विकासाएवजी भकासपणा कडे वाटचाल होत होती, शहरवासीयांनी मोठ्या विश्वासाने अनेकांना ३५ वर्ष नगरपालिकेत एकहाती सत्ता दिली, केंद्रात राज्यात स्वतःच्या पक्षाचे सरकार असताना आमदारकी खासदारकी दिली. मात्र त्यांनी शहराला काय दिले ? साधा एक उंच पूल उभारता आला नाही. घरासमोरचे रस्ते मोठे करता आले नाहीत. नदी सुशोभिकरण नावाखाली नदीत अतिक्रमण करून विद्रूप केली, मुंबई सी लिंक च्या धर्तीवर पूल उभारू सांगितला ते थडगे आता कपडे सुकवण्यासाठी वापरत आहेत. एकप्रकारे यांनी त्यांना जनतेने दिलेल्या मतांचा अपमान केला, शहरवासीयांची फसवणूक केली आहे, मात्र मला आमदारकीची संधी मिळाली तेव्हा सुरुवातीचे अडीच वर्ष विरोधी पक्षाचे सरकार होते. २०२१ मध्ये या तितूर नदीला एका वर्षात ७ वेळा महापुर आला, जुन्या पुलाखालून पाणी पास होत नसल्याने तसेच नदीमधील अतिक्रमणामुळे पुराचेशहरवासीयांच्या घरात, दुकानात घुसले, संसार उघड्यावर आले. माझ्यासाठी हे सर्व दृश्य वेदनादायी होते. त्यावेळीच ठरवले कि कुठल्याही परिस्थितीत तितूर नदीवरील हा जुना पूल पाडून त्याजागी नवा पूल उभारायचा आणि आज रेकॉर्डब्रेक अश्या ११५ दिवसांच्या वेळेत या पुलाचे काम पूर्ण होऊन तो जनतेसाठी खुला होत आहे. जनतेने संधी दिली म्हणून माझ्याहातून हे विकासकाम उभे राहू शकले त्यामुळे हे विकासकाम नम्रपणे सर्व चाळीसगाववासीयांना अर्पण करतो अशी भावना चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.

ते चाळीसगाव शहरातील हॉटेल दयानंद जवळील तितूर नदीवरील नवीन पुलाच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. पुलाचे लोकार्पण जरी झाले असले तरी या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणं सुरू असल्याने कामाला व रहदारी ला अडथळा होऊ नये म्हणून मोठ्या वाहनांना १५ ऑगस्ट पर्यंत पुलावर प्रवेश नसणार आहे. त्यामुळे आता पुलावरून तीनचाकी रिक्षा, दुचाकी मोटारसायकल व पादचारी यांना वापर सुरू राहील.

READ ALSO

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मच्छिंद्र राठोड, माजी नगराध्यक्ष डी.आर. चौधरी, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, जेष्ठ नेते उद्धवराव महाजन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उपअभियंता अनिल बैसाने, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवयानी ताई ठाकरे, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष नितीन पाटील, घृष्णेश्वर पाटील, संगीताताई गवळी, एड. सुलभा पवार, वैशाली राजपूत, संजय रतनसिंग पाटील, आनंद खरात, संजय भास्करराव पाटील, ए.ओ. पाटील सर, कपिल पाटील, धनंजय मांडोळे, बाबूलाल पवार गुरुजी, प्रशांत देशमुख, किशोर पाटील, विवेक चौधरी, प्रभाकर चौधरी, रामचंद्र जाधव, अमोल नानकर, अमोल चौधरी, गुरुजी अनिल बैसाणे प्रशांत पालवी बापू अहिरे अजय वाणी, संभाप्पा घुले, साहेबराव राठोड, शैलेंद्र पाटील, सुनील जमादार, राहुल पाटील, किशोर पाटील, निलेश वाणी, प्रदीप पाटील, विनोद घुमरे, मानसिंग राजपूत, बाबा पवार, नाना चौधरी, भाऊसाहेब पाटील, विजय जाधव, अल्लाउद्दीन दादा, अगगा सय्यद यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१०० दिवसांचे टार्गेट, मात्र १५ दिवस लोकार्पणाला उशीर झाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली दिलगिरी !

हॉटेल दयानंद जवळील तितुर नदीवरील पूल हा जुन्या राष्ट्रीय महामार्ग २११ वरील शहरात सर्वात महत्वाचा रस्त्यावर असल्याने हा मार्ग बंद झाला तर शहर वासीयांची तसेच बाजारात जाणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार होती. त्यामुळे मार्च २०२४ मध्ये टेंडर प्रकाशित झाल्याल्यानंतर पावसाळा सुरु व्हायच्या अगोदर म्हणजे १०० दिवसांच्या आत या पुलाचे काम पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केला मात्र काम सुरु झाल्यानंतर नागरिकांनी पुलाची उंची अजून वाढवावी अशी मागणी केली त्यामुळे नवीन परवानगी घेण्यास अजून २० दिवस उशीर झाला. त्यामुळे पुलाच्या कामाला उशीर झाला मात्र यावर देखील काहींनी राजकारण केलं. काहींनी तर अजून १ वर्ष पुलाचे काम पूर्ण होणार नाही असे आखाडे बांधले मात्र कंत्राटदार लक्ष्मी कन्स्ट्रक्शन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे काम पूर्ण केले, मी त्यांचे देखील आभार मानतो तसेच लोकार्पणाला १५ दिवस उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. पुलावर दोन्ही बाजूला आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून आकर्षक रंगांचे पथदिवे बसविण्यात आले आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी पुलाची शोभा अजूनच वाढणार असून हा पूल शहरवासीयांचे एक आकर्षणाचे केंद्र बनणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: aamdar mangesh chavhanChalisgaon

Related Posts

चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १० जुलै २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! पैश्यांचा पाऊस पाडण्यासाठी महिलेला जीवंत जाळलं

December 21, 2021

पेट्रोल दोनशेवर गेल्यास दुचाकीवर ट्रिपल सीटला परवानगी देणार ; भाजप नेत्याची मोठी घोषणा !

October 20, 2021

धरणगावजवळ अपघात ; दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

September 6, 2020

शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरला उमेदवारी देण्याविषयी राऊत म्हणाले…

November 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group