
चाळीसगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रीयकृत बँकेतून कोणतीही फी न घेता १० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ५ लाख रुपये उकळून व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक येथील एका व्यक्तीविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगावातील शास्त्री नगरात राहणारे गोविंद हिरालाल चौधरी यांचे – चायनिज खाद्यपदार्थांचे दुकान आहे. – व्यवसायाच्या विस्तारासाठी त्यांनी मोठे कर्ज घेण्याचे ठरविले होते. – याचदरम्यान त्यांची ओळख शांताराम – मार्तंड संदान पाटील (रा. सह्याद्री – अपार्टमेंट, मखमलाबाद, नाशिक) याच्याशी झाली. शांताराम पाटील याने गोविंद चौधरी यांना विश्वासात घेत, राष्ट्रीयकृत बँकेतून कोणतीही फी न घेता १० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार चौधरी यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र त्यानंतर पाटील याने प्रोसेसिंग फी म्हणून ५ लाख रुपये भरणे आवश्यक असल्याचे सांगितले.
दागिने विकून दिले पाच लाख रुपये
कर्जाच्या आशेने गोविंद चौधरी यांनी पत्नीचे दागिने विकून दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी शांताराम पाटील यांच्या बँक खात्यात ५ लाख रुपये जमा केले. मात्र बराच कालावधी उलटल्यानंतरही कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे चौधरी यांनी कर्ज नको असून भरलेले पैसे परत करण्याची मागणी केली.
‘जे होईल ते करुन घ्या’ म्हणत दिली धमकी
शांताराम पाटील याने आज देतो, उद्या देतोर असे सांगत पैशांची परतफेड करण्यास टाळाटाळ केली. उलट तुमच्याकडून जे होईल ते करून घ्यार अशी धमकी दिली. दरम्यान, गोविंद चौधरी व त्यांचे काही मित्र नाशिक येथे शांताराम पाटील यांच्या घरी गेले असता, आठ दिवसांत पैसे परत करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यानंतरही रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर गोविंद चौधरी यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून शांताराम मार्तंड संदान पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















