जळगाव (प्रतिनिधी) येणाऱ्या दहा जुलै रोजी बकरईद व आषाढी एकादशी निमित्त दोन्ही समाजांनी आपले धार्मिक कार्यक्रम करावे. परंतू त्यात कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जळगाव विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे झालेल्या सर्व धर्मीयांच्या शांतता समितीच्या बैठकीत केले. यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे व मनपा जळगावचे प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांची उपस्थिती होती.
यांनी घेतला चर्चेत सहभाग
या सर्व धर्मीय शांतता सनीतीच्या काही निवडक प्रतिनिधींनी आपल्या सूचना सादर केल्या त्यात प्रामुख्याने एमआयएमचे माजी अध्यक्ष जिया बागवान, जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, एमआयएमचे महानगर अध्यक्ष दानिश शेख, नियाजली फाउंडेशनचे अयाज अली, शहर महानगरपालिकेचे नगरसेवक सदाशिव ढेकळे यांनी आपले विचार बैठकीत मांडले त्यात प्रामुख्याने कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावता कामा नये त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करून आपापली धार्मिक कर्तव्य पार पाडण्याचे आश्वासन संबंधितांनी पोलीस विभागास दिले.
चिंता साहेबांचे मार्गदर्शन
सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी मार्गदर्शन करताना कायदा हा कसा सर्वश्रेष्ठ आहे हे समजून सांगतले. यावेळी त्यांनी वेगवेगळे उदाहरण दिले. त्याचप्रमाणे आपण आपले धार्मिक कर्तव्य जरूर पार पाडा परंतू इतर धर्मियांची अवेहलना करू नका. तसेच आपल्या भावनांचा विचार करूनच योग्य ती कारवाई करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांनी सादर करताना ईद व आषाढी एकादशीनिमित्त पोलीस दलाच्या नागरिकांकडून काय?, अपेक्षा हे सविस्तर विशद केले. तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव बोरसे यांनी आभार व्यक्त केले.
बैठकीत यांची होती उपस्थिती
पोलीस पाटील सुवर्णा उमरे, सविता पंडित, विठ्ठल पाटील, रायसिंग जयसिंग, इकबाल पिरजादे, फारुख शेख, दस्तगीर शाह, अयाज अली, एडवोकेट आमिर शेख ,शेख अहमद सर, अरुण जाधव, दिलीप पाटील, संजय चिमण कारे, चंद्रशेखर सूर्यवंशी, शरद सोनवणे, वसीम शेख, मुशीर खान ,रियाज काकर, आसिफ शाह, अखिल खान, जीया बागवान, शकील मदनी, सलीम पटेल, विनोद गोपाळ, उमेश पाटील, साहेबराव बागुल ,बाबू पिंजारी, सुरेश नरदे ,वाहेद खान, श्रीकृष्ण बारी, शरद राजाराम आणि अनिस शहा आदींची उपस्थिती होती.