अमळनेर (प्रतिनिधी) कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीमुळे वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी रुपये ५१ हजार आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पलता पाटील यांनी नगर परिषदेतर्फे रुपये २१ हजाराचा धनादेश अमळनेर विभागीय अधिकारी सीमा आहिरे यांचेकडे सुपूर्द केला.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करु नये, अभिष्टचितन करण्यासाठी कुणीही प्रत्यक्ष भेटु नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नयेत सोशल मिडीया व ई मेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्विकारु शिवाय राज्यात कोरोनाचे संकट कायम आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यताही वैद्यकीय तज्ञांनी व्यक्ती केली आहे, त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे. कुठलेही जाहिर कार्यक्रम करु नयेत.
पूर, आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायत्ता निधीमध्ये आपले योगदान देवून सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
२७ जुलै रोजी मा. मुख्यमंत्री उद्धव ाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तीमुळे तो साजरा न करण्याचा आवाहनास प्रतिसाद देत आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी रुपये ५१ हजार आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पलता पाटील यांनी नगर परिषदेतर्फे रुपये २१ हजाराचा धनादेश सीमा आहिरे, विभागीय अधिकारी, अमळनेर भाग अमळनेर यांचेकडे देतांना आ. कृषिभूषण साहेबराव पाटील, प्रशांत सरोदे मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद, संजय चौधरी, विक्रांत पाटील, संदिप गायकवाड, संजय पाटील (भूतबापू), डॉ. राजेंद्र पिंगळे, सुरेश पाटील, सरपंच सुंदरपट्टी आदी उपस्थित होते.