TheClearNews.Com
Friday, September 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

दहीहंडीवर स्थान; ६८५ युवतींचा सहभाग प्रवेश विनामूल्य; कुटुंबीयांसह उत्सव अनुभवण्याची संधी

vijay waghmare by vijay waghmare
September 4, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) : भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युवतींची दहीहंडी २०२६’ चा थरार शनिवारी (दि. ५) शिवतीर्थ मैदानावर रंगणार आहे. नारीशक्तीचा साहसी आविष्कार, युवतींच्या धाडसाचा थरार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष अनुभवण्याची संधी जळगावकरांना मिळणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री ९.३० या वेळेत हा सोहळा होणार असून, उत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. युवतींनी मानवी मनोऱ्यांचा कसून सराव केला असून, धाडसाचे कौशल्य सादर करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे, दहीहंडी ज्या उंचीवर असेल, त्याच उंचीवर देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंचे पोस्टर लावण्यात येणार आहेत. या खेळाडूंच्या कर्तृत्वातून सहभागी युवतींना प्रेरणा मिळावी, हा त्यामागील उद्देश आहे.

‘युवतींची दहीहंडी २०२६’मध्ये किड्स गुरूकूल इंटरनॅशनल, अनुभूती स्कूल, आर. आर. विद्यालय, केसीई सोसायटी मुलींचे वसतिगृह, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय,
एस. ए. बाहेती महाविद्यालय, त्रिमूर्ती महाविद्यालय,
के. सी. ई. इंजिनिअरिंग कॉलेज, हरिजन कन्या छात्रालय, एल.एच. पाटील पब्लिक स्कूल, के‌. के. इन्स्टीट्यूट आफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल आदी शाळा-महाविद्यालयांतील १५ महिला गोविंदा पथकांमधील तब्बल ६८५ युवती सहभागी होणार आहेत. सहभागी युवतींच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली असून, प्रत्येक महिला गोविंदाचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा आयोजकांकडून उतरविण्यात आला आहे.

READ ALSO

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

स्पर्धा नव्हे, उत्सव; सर्वांना समान संधी

हा केवळ स्पर्धेचा कार्यक्रम नसून समता आणि समान संधीचा उत्सव असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सहभागी सर्व १५ संघांना दहीहंडी फोडण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी मैदानावर १५ दहीहंड्या उभारण्यात येणार असून, त्यावर भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंचे पोस्टर लावण्यात येणार आहेत.

युवतींसाठी ६३ हजारांची रोख पारितोषिके

मागील वर्षी समारोपावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी युवतींसाठी रोख पारितोषिकांची घोषणा केली होती. त्याची यंदा पूर्तता करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी ३१ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २१ हजार १११ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ११ हजार १११ रुपये, अशी एकूण ६३ हजार ३३३ रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. उत्कृष्ट साहसी खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या युवतींचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असून, सर्व सहभागी संघांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल..

उडाण फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, ग्लडियेटर डान्स क्लासेस, किड्स गुरूकूल इंटरनॅशनल स्कूल, एल.एच. पाटील पब्लिक स्कूल सांस्कृतिक नृत्य सादर करतील. के के इन्स्टीट्यूट योगा, एकलव्य मल्लखांब अकॅडमी, रुद्र योगा तर्फ रोप मल्लखांब, योग नृत्य सादर करतील. कु. कल्याणी महाजन व श्रीराम गुरूकूल मर्दानी खेळ सादर करतील. नागपुरचे सौ. सुनिता मौर्य महिमा मौर्य हुला हूप नृत्य सादर करतील. पुण्याचे कामत काका हे आपल्या रशियन स्टाईल ने नृत्य करतील.

ढोलवादकांचा दणदणाट अन् लेझर शो

‘शौर्यवीर’ आणि ‘महाबली’ या दोन ढोल पथकांतील तब्बल २१३ ढोलवादक दमदार वादनाने वातावरण दणाणून सोडणार आहेत. मर्दानी खेळ, चिमुकल्यांचे सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाईव्ह सिंगिंग, स्लाईन डीजे, लेझर शो आणि आकर्षक फटाक्यांची आतषबाजी हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. शहरातील १५ रिल्स स्टार युवतींचाही उत्सवात सहभाग राहणार आहे. दहीहंडीचा हा उत्सव सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. जळगावकरांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवतींच्या धाडसाला दाद द्यावी, असे आवाहन उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले.

या पत्रकार परिषदेवेळी दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षा डॉ. सिमा पाटील, उपाध्यक्ष उषा जैन, स्वागत समितीच्या सदस्या रूपाली वाघ, डॉ. अनिता पाटील, हर्षाली चौधरी, सोनाली पाटील, मिनल जैन, हेमांक्षी वानखेडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonExcitement peaks… Young women’s Dahi Handi at Shivteerth!

Related Posts

जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2026 !

September 4, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दहा हजारांची लाच घेताना पीएसआय एसीबीच्या जाळ्यात !

June 13, 2024

अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल नियमानुसारच : महावितरणचे स्पष्टीकरण

April 21, 2022

हिताची कंपनीतून सोलारच्या साहित्यांची चोरी ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

September 11, 2024

दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

October 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group