धरणगाव प्रतिनिधी । सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी काकासाहेब खंडू केशव शिंदे ( पिंप्री ) हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. शिंदे काकांनी ३३ वर्ष प्रामाणिक सेवा केली. सार्वजनिक बांधकाम विभाग धरणगांवच्या वतीने खंडू केशव शिंदे यांचा सेवापुर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एम. बी. ठाकुर यांनी खंडू केशव शिंदे यांचे भरभरून कौतुक केले. अतिशय प्रामाणिक कर्मचारी , २४ तास सेवा देण्यासाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्व शासकीय कामात, नेहमी अग्रेसर असणारे कर्मचारी , हेलिपॅड तयार करणे असो वा रात्री अपरात्री रस्ता मोकळा करणे , सर्वच कामातील अग्रेसर व्यक्ती आज आपल्यातून सेवा मुक्त होत आहेत ,असे प्रतिपादन केले. या पूर्वी त्यांच्या कार्याच्या पावती बद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर यांनी प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव केला आहे. सेवपूर्तीच्या कार्यक्रमाला लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, एपीआय गुंजाळ, ठाकूर साहेब उपअभियंता, सी व्ही महाजन, सतिश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी व आप्तेष्टांनी त्यांना पुढील सुखी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते खंडू केशव शिंदे ( पिंप्री ) यांचा शाल – श्रीफळ – पुष्पगुच्छ – ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.
या सेवापुर्ती सोहळा प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ” भारताच्या संविधानाच्या प्रती ” भेट स्वरूप देऊन ऋण व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी व पोलीस स्टेशनचे API गुंजाळ साहेब व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एम. बी. ठाकुर होते. यांच्या समवेत सी. व्ही. महाजन , जी. एन. लांडगे , पी. एस. माळी, एस. ए. सपकाळ, चिखलोदकर रावसाहेब , खाटीक रावसाहेब, वाघ रावसाहेब, सांळुखे रावसाहेब , हैदर तडवी व सार्वजनिक बांधकाम विभागाचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.
बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , भारत मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्राचे राज्य महासचिव मा. मोहन खंडू शिंदे , छत्रपती क्रांती सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , बामसेफचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील , माळी समाजाचे कोषाध्यक्ष विनोद माळी , बामसेफ तालुका उपाध्यक्ष हेमंत माळी , राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब चौधरी , शहराध्यक्ष गोरखभाऊ देशमुख , प्रोटान चे अध्यक्ष सुनिल देशमुख , उपाध्यक्ष सतिष शिंदे , भारत मुक्ती मोर्चाचे गौतम गजरे , बुद्धीष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष निलेश पवार , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे सिराज कुरेशी , शहराध्यक्ष नगर मोमीन , करीम लाला , विक्रम वाघमारे , आकाश बिवाल, आनंद पाटील, अमोल बिऱ्हाडे , अमोल गजरे , मयूर भामरे , दिपक सोनवणे , तसेच सर्व बामसेफ व सर्वसहयोगी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सेवापुर्ती सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. पाटील तर आभार लक्ष्मण पाटील यांनी मानले.