धरणगाव (प्रतिनिधी) येथील संजयनगर स्थित महात्मा फुले इज ब्रँड संघटना आयोजित खुल्या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत बऱ्याच संघांनी भाग घेऊन आपापली कौशल्य दाखवत संघ भावना उत्साहपूर्ण वातावरणात सादर केली.
परिणामी बाभळे गावाचा संघ विजयी ठरत प्रथम पारितोषिक सन्मानचिन्ह व रोखरक्कम ३३३३ रुपये सामाजिक कार्यकर्ते हेमंत काशीनाथ महाजन तसेच व्दितीय बक्षीस महात्मा फुले ब्रँड ग्रुप यांना २२२२ रुपये ध.न.पा. नगरसेवक सुरेश भास्कर महाजन व तृतीय बक्षीस ११११ रुपये बापू चावदस महाजन यांच्याकडून शिवसेनेचे लोकसभा सह संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ व विभाग प्रमुख संजय वामन चौधरी यांच्या हस्ते विजयी संघाला देण्यात आले.
याप्रसंगी बहुसंख्य क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. त्यात अनिल फराटे सोपान महाजन रवींद्र महाजन, गजानन महाजन, समाधान महाजन, अमर मराठे, मुन्ना महाजन, पंकज महाजन, सागर गायकवाड, मयूर मोरवकर इ..क्रिकेट प्रेमी व आयोजक उपस्थित होते.