पुणे (वृत्तसंस्था) पिंपरी-चिंचवडमध्ये दिघीमधील एका लॉजमध्ये जोडप्याचे मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीचा खून करून प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणामधील ३० वर्षीय आरोपी प्रकाश ठोसरने आधी प्रेयसीचा खून केला. नंतर त्याने स्वत: आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रकाश महादेव ठोसर (वय २८, रा. अजंठानगर, चिंचवड) आणि वैशाली चव्हाण अस या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या जोडप्याचं नाव आहे. हे दोन्ही चिंचवडच्या अजिंठा नगरमध्ये राहणारे आहेत. प्रकाश ठोसर याने आत्महत्या केली. तर ३५ वर्षीय महिलेचा खून झाला आहे. पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेली माहितीनुसार, प्रकाश अविवाहित असून महिला विवाहित आहे. हे दोघेही दिघीतील मॅगझीन चौकातील एका लॉजवर आले होते. त्यांच्यात काहीतरी कारणावरून वाद झाला, यामध्ये प्रकाश याने महिलेचा गळा दाबला आणि तिचा खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली असून दोघांचे मृतदेह नग्नावस्थेत आढळले. या जोडप्यामध्ये विवाहबाह्य संबंध होते का? याचा दिघी पोलिस तपास करत आहेत.