पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील तरुणीवर लॉजमध्ये जबरदस्ती शारीरिक संबंध करतानाचा व्हिडीओ तयार करून व्हाटसअॅपग्रुपवर प्रसारित केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चुलत मामेभाऊ नितीन प्रल्हाद अहिरे याने तिच्यासोबत मैत्रीकरून स्वतःच्या व त्याच्या घरी आणि फर्दापुर येथील लॉजवर वेळोवेळी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच फर्दापुर येथील लॉजवर शारीरक संबंध करतांनाचा व्हिडीओ स्वतःच्या मोबाईलमध्ये तयार केला. एवढेच नव्हे तर, तो व्हीडिओ सर्व मित्र परिवाराच्या मोबाईलवरील व्हाट्अपग्रुपवर प्रसारीत केला. यानंतर पिडीडीतेच्या नातेवाईकांनी याबाबत नितीनच्या आई-वडिलांकडे याबाबत जाब विचारला असता त्यांनी पिडीत तरुणीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात नितीन प्रल्हाद अहिरे, प्रल्हाद दशरथ अहिरेसह एका महिलेविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात भादवि कलम ३७६ (२) (एफ)(एन),३५४ (ए)(आय),५०६ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील ६१ ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि किसन लक्ष्मणराव नजन पाटील हे करीत आहेत.
















