जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन २०२१-२२ साठी दिनांक २ जुलै, २०२१ अन्वये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक १ ऑगस्ट, २०२१ पर्यंत देण्यात आलेली होती.
तथापि, राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची मुदत आता ३१ ऑगस्ट, २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.