जळगाव (प्रतिनिधी) एका विद्यार्थिनीचा चेहरा असलेले बनावट अश्लील फोटो बनवून हॉस्टेल इन्चार्जला पाठवत तिला होस्टेलमधून काढून टाका, असा मॅसेस पाठवून बदनामी केलीप्रकरणी एका अज्ञात मोबाईल नंबर धारकाविरुद्ध जळगाव सायबर पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव शहरातील एका इंजिनीअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या विद्यार्थिनीची बदनामी करण्याच्या इराद्याने + १ ( २३९ ) ६७६ ६२४० या व्हॉटसअॅप क्रमांक पिडीतेचा चेहरा असलेले अश्लील फोटो बनवून हॉस्टेल इन्चार्जला पाठवले. तसेच त्या विद्यार्थिनीला हॉस्टेलमधून काढून टाकले नाही तर सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. अशोक उतेकर हे करीत आहेत.