भुसावळ (प्रतिनिधी) अहमदाबाद एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात प्रवाशांची तिकिटे तपासून त्यांच्याकडून दंड वसूल करणाऱ्या तोतया टीटीईला कागदपत्रांसह रंगेहात अटक करण्यात आली आहे. राज भैयालाला मालवीय (३८, गल्ली क्र. १. गाडगेबाबानगर, अमरावती) असे या तोतया टीटीईचे नाव आहे.
राज भैयालाला मालवीय हा प्रवाशांकडील तिकीट तपासत असतानाच टीटीई टाडा व तिवारी यांनी त्यास पकडले. चौकशी केली असता त्याच्याकडून काळ्या रंगाच्या बॅगमधून पॅन कार्ड व दंड वसुलीचे बनावट पासबुक जप्त करण्यात आले. या पुस्तकात ५४ पाने आणि ज्यात पहिल्या पानावर ३०० रुपये आणि मुख्य तिकीट निरीक्षक खंडवा यांचा स्टॅम्प आणि त्यावर शिक्का मारलेला आढळून आला. उर्वरित ५३ पानांवर मुख्य तिकीट निरीक्षक खंडवा यांच्या गोल स्टॅम्पव एक पेपर कटर सापडला. मालवीय याला आरपीएफचे एसआय ए. के. तिवारी, एएसआय प्रेम चौधरी, सीटी जय कुमार, सीटी नथू पडघन आणि जीआरपी, बीएसएलचे एच. सी. सरोदे, एच. सी. पाचपोर यांच्या ताब्यात दिले. याबाबत खंडवा आरपीएफ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीविरुध्द यापूर्वीही अशाच प्रकारचा गुन्हा बडनेरा रेल्वे पोलिसांत दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.