TheClearNews.Com
Wednesday, June 25, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फाली..उदयोन्मुख नेतृत्व विकासाची वाट : अनिल जैन !

फालीच्या दुसऱ्या सत्राचा समारोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 7, 2023
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कृषिप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. कृषीक्षेत्रात भविष्यात सशक्त नेतृत्व निर्माण व्हावे, शेतीविषयक आत्मविश्वास वाढून ती व्यवसायाभिमूख व्हावी यासाठी फाली उपक्रम राबवित आहोत. शिष्यवृत्ती देणे, इंटर्नशिप उपलब्ध करून देणे आणि व्यवसाय उभारणीसाठी ‘बीजभांडवल’ उपलब्ध करून देणे ह्या तीन प्रकारे फाली विद्यार्थ्यांना मदत करत असते. विज्ञान, तंत्रज्ञानासह कृषिअभियांत्रिकी क्षेत्रात प्रगतीसाठी प्रोत्साहित करणे. यातुन ॲग्रिकल्चर इंजिनियर तयार होऊन कृषी क्षेत्राला व्यावसाईक रूप देतील व शेतीतील नैराश्य नक्कीच कमी होईल, अशा विश्वास जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा फालीचे चेअरपर्सन अनिल जैन यांनी व्यक्त केला.

गोदरेज अॅग्रोवेटचे कार्यकारी संचालक बुर्जीस गोदरेज यांनी फालीतील विद्यार्थ्यांचे कौतूक केले. संशोधक वृत्ती, जिज्ञासा व परिश्रम हे तिन्ही गुण फ्युचर ॲग्रीकल्चर लिडर अर्थात फालीतील विद्यार्थ्यांजवळ असल्याचे सांगितले. फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी यांनी फाली उपक्रमांच्या फलश्रुतीबद्दल सविस्तर सांगितले. महाराष्ट्र, गुजरात राज्यांमध्ये सुरू असलेला फाली उपक्रम आता पुढील टप्प्यात मध्यप्रदेशमध्येही विस्तारीत केला जाणार असल्याचे त्या म्हणाल्यात.

READ ALSO

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

फालीच्या दुसऱ्या टप्प्यातील समारोप सत्रावेळी बोलत होत्या. यावेळी ५५ संशोधन यांत्रिकी मॉडेल व व्यवसाय योजना यांचे सादरीकरण जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंडवर विद्यार्थ्यांनी केले. पारितोषिक वितरणाप्रसंगी अथांग जैन, मोहित व्यास, जी. चंद्रशेखर, अंजिक्य तांदळे, सबोरणी पोद्दार, अजय तुरकाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. फालीचे माजी विद्यार्थी शिवम शेलार, रोहन रणवरे यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्यावतीने श्रावणी गोलादे, अक्षरा देसले, भुषण लाहिटकर, संस्कृती काकोणे, सोहम पाटील यांनी आपले अनुभव कथन केले. सूत्रसंचालन हर्ष नौटीयाल, रोहिणी घाटगे यांनी केले. आभार नॅन्सी बॅरी यांनी मानले.

यावेळी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, जैन फार्मफ्रेश फूडस लि. संचालक अथांग जैन व प्रायोजित कंपन्यांचे परीक्षक असलेल्या सदस्यांनी यांनी पाहणी केली. एकात्मिक शेती पध्दत, पिक संरक्षक एके-47, सौर ऊर्जेवर चालणारे ट्रॅक्टर, सायकल वापरून ज्यूस तयार करणे, मल्टीपर्पज कृषीअवजारे यासह अनेक भन्नाट संशोधनात्मक यंत्रे विद्यार्थ्यांनी सादर केली होती.

संशोधनामुळे शेती समृध्द होऊ शकते- अशोक जैन
विद्यार्थ्यांनी सादर केलेले यंत्र बघितल्यानंतर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी प्रतिक्रिया दिली. त्यात ते म्हणाले की, ‘शेती, शेतकरी ज्या अडचणींना सामोरे जात आहेत त्यावरील उपाययोजना म्हणून विविध संशोधक मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यात एक रोबोट आठ प्रकारची कामे करू शकतो, मजुरीवरील खर्च कमी होणारी उपकरणे यासह अन्य उपकरणे ती कृषिक्षेत्राला समृद्ध करतील असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.

शेतीला सन्मान मिळावा – अतुल जैन
शेतीला सामाजिकस्तरावर उद्योग म्हणून बघितले पाहिजे. आयटी, मॅकेनिकल इंजिनियरपेक्षा किंवा त्या दर्जाचे उत्पन्न शेतकऱ्यांचे असले पाहिजे. शेतीकडे सुशिक्षित पिढी वळली पाहिजे. शेतकरी मुलांसोबतही आयुष्य चांगले जाईल, हा विश्वास निर्माण व्हावा यासाठी फालीसारखे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन म्हणाले.

दुसऱ्या सत्राचे कृषी बिझनेस व इन्होव्हेशन्सचे सादरीकरण
फालीच्या दुसऱ्या टप्प्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी ५५ बिझनेस मॉडेल्सचे प्रभावी सादरीकरण केले. त्यात नीम तेल व पावडर, शेतातील पाचटापासून बायोडिग्रेडेबल प्लेट, बाऊल बनविणे, मश्रुमचे उत्पादन, इको फ्रेंडली बोरवडी, संत्राचे विविध उत्पादने, तृणधान्यांपासून स्नॅक्स, ह्युमिक अॅसिड बनविणे, चिंच व त्याचे बाय प्रॉडक्ट, कवठाचे उत्पादन व त्यापासून विविध पदार्थ, गोट फार्मिंग, पोल्ट्री, ऊसाचे विविध उत्पादने, मधमाशीपालन, केळी चिप्स, कांदा व त्याचे विविध पदार्थ, गायीच्या शेणापासून विविध उत्पादने, अॅग्रोटुरिझम, कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पिरूलिना म्हणजे शेवाळची शेती हा नावीन्यपूर्ण बिझनेस मॉडल विद्यार्थ्यांनी सादर केले.

दोघंही स्पर्धांमध्ये हे होते परीक्षक
या दोन्ही स्पर्धांचे परीक्षक म्हणून गोदरेज अॅग्रोवेटचे बुर्जिस गोदरेज, मोहित व्यास, यूपीएलचे अजिंक्य तांदळे, प्रदीप पाटील, अमूलचे डॉ. जे. के. पटेल, डॉ. बी. एम. भंडारी, जैन इरिगेशनचे डॉ. अनिल ढाके, डॉ. बालकृष्ण यादव, किशोर रवाळे, ओमनिओरचे सबोरणी पोद्दार, उज्जीवन स्मॉल फायनान्स रोहीत पाराशर, आयसीआयसीआय फाऊंंडेशनचे अनुज अग्रवाल, दीपक पाटील, मोनिका आचार्य, रॅलिज इंडियाचे अजय तुरकाने, सुचेत माळी, महेंद्राचे डॉ. शुभम, स्टार अॅग्रीचे विशाल पाठक, जी. चंद्रशेखर, अॅक्सीस बँकेचे मनिष साळुंखे, किरण नाईकवडी या सदस्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

बिझनेस प्लॅन सादरीकरण स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकाचे स्पर्धक पुढीप्रमाणे –
ब्लॅक सोल्जर फाय फार्मिंग, शारदाबाई पवार विद्यानिकेतन अॅण्ड डे स्कूल, बारामती, पुणे (प्रथम क्रमांक), सोया प्रॉडक्ट ज्ञानसागर निवासी शाळा, अष्टी जि. यवतमाळ (द्वितीय), मका कुट्टीपासून बायोडिग्रेडबेल प्लेट व बाऊल बनविणे जिजामाता विद्यालय साखरखेडा जि. बुलढाणा (तृतीय), स्पिरुलिना शेती, कन्या विद्यालय सामोळे जि. धुळे (चौथा क्रमांक) आणि पाचवा क्रमांक अॅग्रीस्टार न्युट्रीशेन, पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय अकुलखेडा ता. चोपडा जि. जळगाव

इनोव्हेशन स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकाचे स्पर्धक पुढीप्रमाणे –
एअर कंडीशन ओनियन स्टोअर हाऊस, खान्देश गांधी बाबुभाई मेहता विद्यालय कासरे जि. धुळे (प्रथम), अॅग्रीकल्चर मल्टीपर्पज रोबोट, न्यू इंग्लीस हायस्कूल मोहपा जि. नागपूर (द्वितीय), मल्टीपर्पज सोलार ट्रॅक्टर, एस. एस. पाटील विद्यामंदीर, चहार्डी, ता. चोपडा, जि. जळगाव (तृतीय), UV-C किरण वापरून फळे आणि भाज्यांचे निर्जंतुकीकरण, परशुराम नाईक विद्यालय बोरगाव मंजू जि. अकोला (चतुर्थ), शेतकऱ्यांची जीवनरक्षक काठी, एस. एम. हायस्कूल, खेडगाव जि. नाशिक यांचा पाचवा क्रमांक आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

June 24, 2025
गुन्हे

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

June 23, 2025
गुन्हे

रिक्षाचालकांची दादागिरी; वाहतूक पोलिसांच्या अंगावर गेले धावून

June 23, 2025
जळगाव

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 23, 2025
जळगाव

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025
जळगाव

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

June 22, 2025
Next Post

‘फार्मर ते ट्रान्सफार्मर’ प्रेरणादायी प्रवास ; शेतकऱ्यांनी उलगडला कृषि विकासाचा पट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 31 जुलै 2024 !

July 31, 2024

महाराष्ट्रातील चित्र बदलतय, हा एकजुटीचा विजय : शरद पवार

December 4, 2020

शिक्षणानेच जीवनात परिवर्तन शक्य : ॲड.रोहिणीताई खडसे !

June 28, 2024

भुसावळात बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा ; पथकाने पकडले रंगेहात !

February 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group