धरणगाव : येथील होमगार्ड पथकातील होमगार्ड कर्मचारी कैलास जगन्नाथ लोहार यांचा सेवानिवृत्त व पथकातील नव्याने भरती झालेले पुरुष अणि महिला होमगार्ड यांचे स्वागत व सत्कार कार्यक्रम इंदरा कन्या महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी समादेशक अधिकारी ईश्वर सखाराम महाजन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. सत्कार मूर्ती कैलास लोहार यांना शाल, श्रीफळ व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जुन्या आठवणीसह आपल्या जीवनातील अनुभव सांगितले. या वेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे अश्रू अनावरण झाले. या कार्यक्रम प्रसंगी माजी होमगार्ड अधिकारी प्रफुल जैन, अशोक देशमुख, हरचंद्र रत्नपारखी व पथकातील पलटण नायक, ईश्वर एस. पाटील, लिपिक जानकिराम पाटील, होमगार्ड अनिल सातपुते, सुदर्शन पाटील, भिकन लोहार, गिरधर महाजन, अरूण सातपुते, भगवान महाजन, रमाकांत बाविस्कर आदीउपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुञसंचलन आत्माराम चौधरी यांनी केले व आभार तालुका समादेशक अधिकारी ईश्वर एस. महाजन यांनी व्यक्त केले. याप्रसंगी पथकातील अनेक होमगार्ड उपस्थित होते.