धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्रीजी जिनिंगमध्ये कापूस खरेदी शुभारंभ प्रसंगी गोदरेज ॲग्रोवेट कंपनीतर्फे स्टॉल लावण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांसह शेतकऱ्यांनी स्टॉलला उस्फुर्त प्रतिसाद दिला.
श्रीजी जिनिंगमध्ये गणेश चतुर्थी निमित्त कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना जीवनआप्पा बयस व सुरेशनाना चौधरी यांच्याकडून भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. यावेळी गोदरेज ॲग्रोवेट कंपनीतर्फे स्टॉल लावण्यात आला होता. स्टॉलवर मका SGA106 व SGA105 या वाणाचे कणीस दाखवून व लिट्रेचर ठेवण्यात आले होते. शेतकऱ्यांना मकाच्या दोघं वानाबद्दल कणसे दाखवून व लिट्रेचर वाटून सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला व येणाऱ्या रब्बी हंगामात गोदरेज कंपनीचे मका SGA106 व SGA105 हेच वाण लावणार अशी प्रतिक्रिया नोंदवली.
या भव्य कार्यक्रमात जिनिंग मालकांनी गोदरेज कंपनीला स्टॉल लावू दिल्याबद्दल गोदरेज कंपनीकडून सौरभ पाटील, सचिन पाटील यांनी त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित पाणीपुरवठा कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, रवी दादा, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.