धरणगाव (प्रतिनिधी) बोरगाव बु येथील पाटावर अंदाजित १ कोटी रुपयांचा पूल मंजूर करण्यात आला आहे. बोरगाव येथील शेतकऱ्यांचा त्रास आता कमी होणार आहे. गावातील शेतकऱ्यांना आता पाटाचे पाणी मिळणार आहे. तसेच अंदाजित १ कोटी रुपयेचा पूल ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला.
ना.गुलाबराव पाटील हे बाहेर गावी असल्याने आज ग्रामस्थांनी भूमिपूजन संपन्न केले. यावेळी उपस्थित महेश मराठे, गोविंद पाटील, जनाआक्का, पिंटू पाटील, नितीन पाटील, दीपक पाटील, गोकुळ पाटील, किशोर मराठे, पप्पू पाटील, निबां कंखरे, दगा मराठे, लक्ष्मण मोरे, ज्ञानेश्वर मराठे, किशोर शेळके व ग्रामस्थ उपस्थित होते.