TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उन्हाळी हंगामातील हंगामी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज सादर करावेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 27, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उन्हाळी हंगामातील हंगामी पिकांसाठी शेतकऱ्यांनी 15 एप्रिल 2023 पर्यंत पाणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांच्या अधिपत्याखालील धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेडी, बुराई, कनोली, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी, अनेर, करवंद, अमरावती, सुलवाडे बॅरेज या मध्यम प्रकल्पांसह 12 मध्यम प्रकल्प, 45 लघु प्रकल्प, कोल्हापूर पद्धतीचे 22 व वळण बंधारे 30 असे एकूण 109 प्रकल्प, तसेच नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्पासह एकूण तीन मध्यम प्रकल्प, 33 लघुप्रकल्प, कोल्हापूर पद्धतीचे सहा बंधारे, 20 वळण बंधाऱ्यांसह एकूण 62 तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अधिसूचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या बागायतदारांनी 1 मार्च 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत एक मार्च 2023 पासून सुरू झालेल्या उन्हाळी हंगाम 2022- 23 मध्ये भुसार/ अन्नधान्ये/ चारा/ डाळी /कपाशी/ भुईमूग व इतर हंगामी पिके इत्यादी पिकांना उन्हाळी हंगामाच्या पिकांना व बिगर सिंचनाचे पाणी वगळून उर्वरित पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार बागायतदार शेतकऱ्यांनी आपले नमुना क्रमांक 7, 7 (अ), (ब) चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 15 एप्रिल 2023 पर्यंत देण्याचे करावे.

READ ALSO

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

पाणी अर्ज स्वीकारण्याच्या शर्ती पुढील प्रमाणे : पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदारांनी आपापल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्वीकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजुरी/ ना मंजुरीचा विचार करण्यात येईल. मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये/ भुसार/ चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेवू नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व दरसाल दर शेकडा दहा टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळी नसताना पाणी घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजवणे, विहीरीवरील पिकास कालत्याचे पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणाऱ्या बागायतदारांचे नियमानुसार पंचनामे करण्यात येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल.

टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. विहित दिनांकापर्यंत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देवून पोहोच पावती घेतली पाहिजे. लाभ क्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिन अर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल. तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील काही मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आलेला आहे. आरक्षित पाणीसाठी वगळता उपलब्ध पाणी सिंचनासाठी संबंधित उपविभागाद्वारे शेतीसाठी पाणी अर्ज स्वीकारले जातील. असेही कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
जळगाव

जिल्हास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निवारणाला गती

April 7, 2026
जळगाव

वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवायचेत? मग मोबाइल नंबर अपडेट करा !

April 6, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
Next Post

जळगावात पुन्हा वकिलाचा अपघाती मृत्यू ; पक्षकाराकडे जात असताना भरधाव कंटेनरने दिली धडक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

October 28, 2021

मोबाईलसह दुचाकी लांबवली ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

October 7, 2024

ठाकरे पितापुत्रांसह सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी होण्याची शक्यता

September 20, 2020

जीपीएस फाउंडेशनतर्फे विटनेर येथील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप !

August 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group