जळगाव (प्रतिनिधी) अब्दुल रज्जाक मलिक चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे १ फेब्रुवारी रोजी सईद मलिक यांच्या ८व्या जयंतीनिमित्त कोरोना यौद्धांचा सन्मान मलिक फाउंडेशन तर्फे शनिपेठ येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, गफ्फार मलीक, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश मामा भोळे, उपमहापौर सूनिल खडके, यांच्या हस्ते करण्यात आला.
व्यासपीठावर सर्वश्री करीम सालार, डॉ. इकबाल शाह, अमीन बादलीवाला, शिवसेना गटनेते सुनील महाजन, नितीन लड्डा, विष्णू भंगाळे, राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील, विलास पाटील, मंगला पाटील, योगेश देसले अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रामानंद जयप्रकाश, नगरसेवक कैलास सोनवणे, शाम कोगटा, चेतन संकट, शरद तायडे, इब्राहिम पटेल, गनी मेमन, डॉ. सुयोग चौधरी, डॉ. मंधार पंडित, डॉ. राजेश पाटील यांची होती उपस्थिती.
फारुक शेख यांना वैयक्तिक पारितोषिक सह संघटनात्मक एकूण चार पारितोषिके
मार्च ते डिसेंम्बर २०२० या १० महिन्यात फारूक शेख यांनी सर्वप्रथम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष म्हणून बिरादरीतर्फे कोरोना काळात गरिबांना रेशनचे किट वाटप केले. त्यानंतर कोरोना मध्ये कोविड केअर युनिटची स्थापना करून जनसंपर्क प्रमुख म्हणून त्या मार्फत शहरात व ग्रामीण भागात वैद्यकीय शिबीर व कौटुंबिक सर्वेक्षण केले व रुग्णांना मोफत औषधोपचार दिला. रूग्ण सेवा, अंबुलन्सची सेवा सह प्रत्यक्ष दवाखान्यात जाऊन रुग्णाची सेवा दिली या अवधीत जे रुग्ण मृत झाले त्यांचा दफन विधी ईदगाह व कब्रस्थान चे मानद सचिव म्हणून आपल्या सहकाऱ्यांच्या मार्फत दफनविधी केला. अशाप्रकारे फारुक शेख यांना संघटनात्मक जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी, मुस्लिम कब्रस्तान ट्रस्ट व कोविड केअर युनिट जळगाव यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आले. तर वैयक्तिकरित्या या १० महिन्याच्या कालावधीत कोविड मध्ये काम करत असताना त्यांना सुद्धा कोरोना झाला असता ईश्वर कृपेने त्यावर मात करून परत सेवेत हजर झाले. त्याबद्दल वैयक्तिक पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
अशा प्रकारे एकाच कार्यक्रमात चार पुरस्कार प्राप्त करणारे फारुक शेख हे एकमेव कोरोना योद्धा ठरले. त्यांच्या या विशेष कार्याची दखल अब्दुल गफ्फार मलिक यांनी घेऊन त्यांना सन्मानित केले. फारूक शेख यांनी हे पुरस्कार सहकारी व संघटनांना समर्पित केले. वरील सर्व पुरस्कार मानियार बिरादरी, कोविड केअर युनिट व मुस्लिम कब्रस्थान या संघटनांना व तेथील सहकारी यांना समर्पित केले.