धरणगाव प्रतिनिधी –
धरणगाव : परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मोठा माळी वाडा परिसरातील मढी येथील मंदिर, पंचक्रोशीतील प्रसिध्द असलेल्या मंदिरांपैकी एक असून या मंदिराची फार जुनी आख्यायिका आहे. येथील महादेव पिंड हे स्वयंभू असून येथे पंचक्रोशीतील भाविकांची नेहमीच मांदियाळी असते. त्याचप्रमाणे गणपती मंदिर, शनी महाराज मंदिर, हनुमान मंदिर यांसह संत शिरोमणी सावता महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे देखील मंदिर आहे. तसेच या ठिकाणी दरवर्षाप्रमाणेच आषाढी एकादशी निमित्ताने संपूर्ण गावातील येणाऱ्या भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. जे भाविक प्रत्यक्ष पंढरपूर वारीस जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठीच या मंदिरातच विठ्ठलनामाच्या गजरात, कार्यक्रम पार पडला. विठ्ठलाची प्रार्थना, भक्तिमय वातावरण, आणि फराळ वाटप यामुळे भाविकांना पंढरपूरचीच अनुभूती मिळाली. आजच्या आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी उपवास फराळ वाटप कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने आणि सेवाभावी वातावरणात पार पडला. दिवंगत शांताबाई व जगन्नाथ खंडू वाघ यांच्या पुण्यस्मरणार्थ या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री. योगेश व राहुल रमेश वाघ यांच्या मित्र परिवाराच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. हा पवित्र उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा माळी, निंबाजी महाजन, दशरथ बापू, रावा आप्पा, विश्वासराव माळी, पंढरीनाथ माळी, व्ही. टी. माळी, विजय महाजन, रमेशआप्पा माळी, लक्ष्मण पाटील, विनोद चौधरी, कैलास वाघ, गुलाब महाजन, ज्ञानेश्वर महाजन, देविदास माळी, जुलाल भोई, बंडू नाना, नाना बाविस्कर, दिपक बाविस्कर, चूनीलाल पाटील, पवन माळी, जयेश जगताप, सोमा चित्ते, धनराज जमादार, बाळासाहेब वाघ, भैय्या महाजन, गोरख देशमुख, दिपक वाणी, विजय सोनवणे, उदय मोरे, संतोष सोनवणे, भरत शिरसाठ, मयूर भामरे, राजेंद्र वाघ, निलेश पवार, आदींनी सहकार्य केले.
















