अहमदनगर (वृत्तसंस्था) सिन्नर-शिर्डी महामार्गावर पहाटेच्या सुमारास आराम बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. (Bus Truck Accident) या अपघातात 10 साईभक्तांचा मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. (Ahmednagar Accident News)
खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. (Accident News) अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे. दरम्यान, अपघातात बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.