रायगड (वृत्तसंस्था) मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव नजीक गुरुवारी पहाटे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ९ जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
ट्रक आणि इको कारमध्ये हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, ९ जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये ४ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहेत. या अपघातात ४ वर्षाचं लहान मुल बचावलं आहे. त्याच्यावर माणगाव येथीस सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. गोरेगाव हद्दीतील रेपोलीनजीक पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. तर गाडीतून प्रवास करणाऱ्या नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात चार वर्षांचा चिमुकला बचावल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूक पोलीस आणि इतर यंत्रणांनी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्याला सुरुवात झाली.