नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील नदी पात्रात आंघोळीसाठी गेलेला एक व्यक्ती नदीपात्रात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गावातील नागरिक या व्यक्तीचा नदीपात्रात सकाळपासून शोध घेत आहेत. याबाबत माहिती पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक आसे की, नांदेड येथील दशरथ मंगेश सोनावणे (वय, ३८) हा व्यक्ती आज सकाळी १० वाजेच्या सुमारास नदी पात्रात आंघोळीसाठी गेला होता. परंतू बराच वेळ झाला बाहेर न आल्यामुळे खाचणे येथील मच्छीमार करणाऱ्या लोकांनी याबाबत नांदेड येथील व्यक्तींना माहिती दिली. त्यानुसार सकाळपासून दशरथ सोनावणे यांचा नदीपात्रात शोध सुरु आहे. परंतू अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, दशरथ सोनावणे हे नदीपात्रात बुडाल्याची भीती करण्यात येत आहे. घटनास्थळी दशरथ सोनावणे यांचे कपडे मिळून आले आहेत.