रावेर (प्रतिनिधी) हृदयविकाराच्या झटक्याने बसमध्येच एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. केसरबाई कोळी (रा. जुने अजनाड), असे मयत महिलेचे नाव आहे.
जुने अजनाड येथील रहिवासी मधुकर कोळी यांच्या पत्नी केसरबाई मधुकर कोळी यांची रात्री तब्येत बिघडल्याने मंगळवारी सकाळी त्यांना उपचारार्थ खानापूर येथील खासगी रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टर नसल्याने ते खानापूर येथून बसने रावेर येथे येत असताना त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे बस चालकाने बस रावेर ग्रामीण रुग्णालयात नेली. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी एन. डी. महाजन यांनी केसरबाई कोळी यांना मृत घोषित केले.