फैजपूर (प्रतिनिधी) संपूर्ण आयुष्यभर देव आपली तो व्यवस्था करतो तर त्या देवाला पण आपण ५६ भोग अर्पण करून आपला आदर व्यक्त करावा हा या पाठीमागचा हेतू असून कोरोना महामारीचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना जनार्दन हरिजी महाराज यांनी केली आहे.
देवाला खूप काही आपल्याकडून अपेक्षा नसतात परंतु आपली श्रद्धा असते. तो आपल्याला सर्व सुख सुविधा पुरवतो. त्याच्यामुळे आपण जगू शकतो, बोलू शकतो. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकुळाचे रक्षण केले होते म्हणून मग त्याला प्रसाद म्हणून हा एक विधी असतो. तेव्हा जसे गोकूळा वरील संकट देवांनी टाळलं. तसे आजही कोरोना महामारीचे संकट देवाने दूर करावे अशी प्रार्थना महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज व सर्व भक्तगणांनी मिळून करण्यात आली. येथील सतपंथ मंदिर संस्थान मध्ये रविवारी सायंकाळी अन्नकूट महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी मंदिर संस्थांचे पदाधिकारी तसेच काही मोजके भक्तगण उपस्थित होते.