धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका भागात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीतून ९ जणांविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, मंगलाबाई (नाव बदलेले) यांच्या घराची भिंत पाडण्यावरून दि. २२ मे २०२२ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास गल्लीतील एका महिलेसोबत सोबत वाद झाला. घराची भिंत बांधण्याचा कारणावरुन जनाबाई अरुण भिल, मंगलबाई दिपक भिल, छायाबाई गणेश भिल यांनी मंगलाबाई यांना शिवीगाळ करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तसेच गळ्यातील मणी मंगळसूत्र व एक पोत तोडून टाकली. घरभरणीचे आलेले ८ हजार रुपये देखील काढून घेतले. तर मानसींग अरुण भिल, गणेश भिल, रोहीत दिपक भिल, विकी दिपक भिल, श्रावण भिल, तुषार भिल अशा सर्वांनी घरात घुसून सामान फेकाफेक केली आणि खिडकीच्या काचा फोडल्या. तसेच अल्पवयीन मुलीला देखील मारहाण करून छेडखाणी करून विनयभंग केला. याप्रकरणी १) जनाबाई अरुण भिल २) मंगलबाई दिपक भिल ३) छायाबाई गणेश भिल ४) मानसींग अरुण भिल ५) गणेश भिल ६) रोहीत दिपक भिल ७) विकी दिपक भिल ८) श्रावण भिल ९) तुषार भिल यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा असून पुढील तपास स.पो.नि.जीभाऊ पाटील हे करीत आहेत.