मुंबई (वृत्तसंस्था) मशिदींच्या लाऊडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन मशिदींच्या ट्रस्टीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. वांद्रे येथील नुरानी मशिद आणि सांताक्रूझ येथील लिंक रोडवर असलेल्या कबरस्तान मशिदीच्या ट्रस्टींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसापासून राज्यात मनसेने मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वांद्रे येथील नुरानी मशिद आणि सांताक्रूझ येथील लिंक रोडवर असलेल्या कबरस्तान मशिदीच्या ट्रस्टींवर गुन्हा दाखल केला आहे.
सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत कोणी स्पीकर वाजवत असेल, तर निश्चित केलेल्या डेसिबलच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नियमांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सर्वाच्या न्यायालयाच्या निर्देशाचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईतील २६ मशिदींनी भोंग्यावरुन अजान लावणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. भोंगे लावण्यासाठी आता स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असणार आहे.