साकळी ता. यावल (प्रतिनिधी) येथुन जवळच असलेल्या थोरगव्हाण ग्राम पंचायतीच्या उपसरपंच ज्योती केवल पाटील यांच्या विरूध्द ८ ग्राम पंचायत सदस्यांनी तहसीलदार महेश पवार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
या संदर्भातील वृत असे की, यावल तालुक्यातील थोरगव्हाण ग्राम पंचायतीच्या विद्यमान उपसरपंच ज्योती केवल पाटील या ग्राम पंचायतीच्या कारभारात मनमानी अविचारी शब्दांचा वापर करतात, तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळी काही एक कारण नसतांना किरकोळ कामकाज सोडुन काही लोकांना शिवीगाळ करतात. त्यांच्या अशा वागणुकीच्या त्रासाला कंटाळुन ग्राम पंचायत सदस्य हिरालाल श्यामराव चौधरी, पदमाबाई विनोद पाटील, मनोहर कृष्णा पाटील, मथुराबाई जगदीश पाटील, शिन्दुबाई राजेन्द्र पाटील, गोपाळ शालीक पाटील, अशोक गोबा भालेराव, यशोदाबाई आनिल भालेराव यांच्या या दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी आहेत. एकुण ९ सदस्य असलेल्या या ग्राम पंचायत मध्ये सरपंच गटाचे ४ सदस्य आणि विरोधी गटाचे पाच सदस्य असुन, विरोधी आणि सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी एकत्र येवुन लोकनियुक्त सरपंच उमेश देवराम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. तीन वर्षात उपसरपंच ज्योती पाटील यांचा विरुध्द दुसऱ्यादां अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे.