जळगाव (प्रतिनिधी) जादा बिल आकारल्याप्रकरणी काल नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात लेखाधिकाऱ्यांनी आज सकाळी सुनावणीसाठी डॉ.नीलेश किंनगे यांना उपस्थित राहण्याचे भ्रमणध्वनीद्वारे कळविले होते. त्यानुसार डॉ. नीलेश किंनगे यांनी सुनावणीदरम्यान स्वतः उपस्थित राहून २ लाख ४४ हजार रुपयांचा धनादेश तक्रारदाराकडे सोपविला.
गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांकडे जादा बिल घेतल्याप्रकरणी तक्रार केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक चव्हाण यांनी २ लाख ४४ हजार रुपये रुग्णाच्या नातेवाइकांकडून ज्यादा घेतले असल्याचे पत्र काढून ते परत करण्याचे आदेश काढले होते. परंतु डॉ. निलेश किनगे गेल्या ०६ महिन्यापासून सदर व्यक्तीची फिरवाफिरव करत होते. व तडजोडीसाठी निरोप पाठवत होते.
सदर प्रकरणाने गेल्या आठवडाभरापासून जोर धरला होता व मंत्रालयीन स्तरावर देखील तसेच जिल्हा पातळीवर तक्रारी करण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे तर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला यासंदर्भात तक्रार देखील नोंदवण्यात आली होती. यामुळे सदर प्रकरण अधिकच चिघळत होते.
याच पार्श्वभूमीवर काल नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणाहून कैलास सोनार (लेखाधिकारी) यांनी आज सकाळी ११:०० वाजता सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे भ्रमणध्वनीद्वारे कळविले होते. यावेळी सुनावणी होऊन सोनार यांच्या समक्ष डॉ. नीलेश किंनगे यांनी सुनावणीदरम्यान स्वतः उपस्थित राहून २ लाख ४४ हजार रुपयांचा धनादेश सदर तक्रार दाराकडे सोपविला.
माझ्या पाठीशी उभ राहणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार
सदर प्रकरणात जळगाव शहरातील सामाजिक व्यक्ती, मंत्रालयीन स्तरावरील व्यक्ती, तसेच वेळोवेळी माझ्या तक्रारीची दखल ज्यांनी घेतली ते जळगाव शहरातील सर्व पत्रकार बांधवांचे तक्रारदार दीपक कावळे यांनी विशेष आभार मानले आहे.