धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र महाजन आणि अनोरेचे सरपंच भगवान महाजन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त महिलेला आर्थिक मदत केली आहे. राजेंद्र महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात आर्थिक मदतीचे धनादेश रुग्ण महिलेच्या भावाकडे सोपविण्यात आले.
शनिवारी लहान माळीवाडा परिसरातील गबानंदा चौकात नगरसेवक तथा शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र महाजन व विलास महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वैशाली देसले नामक महिलेला दुर्मिळ समजला जाणारा सार्कोडेसिस नामक आजार जडला आहे. हा आजार फफ्फुसाशी निगडीत असल्याचे फफ्फुसाचे प्रत्यारोपण करावे लागणार आहे. संबंधित महिलेवर बंगळुरू शहरातील एका मोठ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. फफ्फुस प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला साधारण १६ लाख रुपये खर्च आहे. आतापर्यंत ऑनलाईन ५ लाखाची आर्थिक प्राप्त झाली आहे. परंतू अजूनही मदतीची गरज आहे. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र महाजन यांनी २१ हजार रुपये तर अनोरेचे सरपंच भगवान महाजन यांनी ११ हजार रुपयाची आर्थिक मदत केली. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, पालिका गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासू चौधरी, पी.एम. पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकारी, नगरसेवकांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, रुग्ण महिलेला जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. महिलेला आर्थिक मदत करण्यासाठीची सर्व माहिती खाली दिली आहे.
This Fundraiser Will Give Me A Chance To End Her Sufferings
Hi, I am Priyanka and I have started this fundraiser for my mother Vaishali. Life has been tough for her however, we have not given up hope. We have started this fundraiser for her Lung Transplant Treatment. If you support the cause, She will soon be on her way to recovery and good health.
Donate and Share The Below Link To Help & Support
https://www.impactguru.com/fundraiser/help-vaishali-desale
Indian Tax Benefits Available
Please copy-paste this message and share it with other people so that more and more people can come and donate