मुंबई (वृत्तसंस्था) शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी सिबिलची अट लावू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. जर काही बँकांकडून शेतकऱ्यांना सिबिलची अट लावली जाणार असेल, तर अशा बँकांवर सरकारकडून एफआयआर नोंदवण्यात येईल, असा कडक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
खरीप हंगामासाठीच्या कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना सिबिलची अट लावली जात असल्याबाबत मंगळवारी पत्रकारांनी विचालेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच खरीपपूर्व बैठकीत शेतकऱ्यांना खतांची बियाणांची उपलब्धता करून देण्याबाबत शासनाकडून आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर लिंकेजच्या संदर्भात केवळ कृषी सेवा केंद्रावरच नव्हे तर ज्या कंपनीच्या उत्पादनाचे लिंकेज होत आहे, त्या कंपनीवरदेखील कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.