शेंदुर्णी ता. जामनेर (प्रतिनिधी) येथील एका जिनिंगमध्ये आग लागून ३० ते ३५ लाखांची कपाशीची रुई जळून खाक झाली आहे. या प्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, शेंदुर्णी ता. जामनेर गावी गट नंबर ५२० / २ / २ कृष्णा उद्योग C/o नर्मदा कॉटन इंस्डस्ट्रिज जिनिंगच्या गोडावूनमध्ये दि. ७ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक इलेक्ट्रीक शॉर्ट सर्कीट झाल्यामुळे आगद लागली. यात दोन्ही गोडावूनमध्ये असलेली अंदाजे १९० क्विटल वजनाची कपाशीची रुई जळून आगीत राख होत, अंदाजे ३० ते ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी दीपक रामचंद्र अग्रवाल यांच्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरनारे हे करीत आहेत.