धरणगाव प्रतिनिधी – येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट आयोजित कै.रेश्माबाई नेमीचंद जैन NGO पुणे द्वारा संचालित सुयश हेल्थ केअर विद्यमाने ATM डिजिटल मशिनद्वारे संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर सभागृहात उत्साहात संपन्न झाले. आरोग्य शिबीर संदर्भात जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन यांनी प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तत्पूर्वी भ.महावीर यांच्या प्रतिमेला डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद डहाळे यांनी माल्यार्पण करून तपासणी शिबिराचे उद्घाटन केले. याप्रसंगी डॉ. डहाळे यांनी मनोगतात सांगितले की, नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे, प्रत्येकाला निरोगी व आनंदी जीवन जगता यावे यासाठी श्री आदिनाथ दिगंबर जैन ट्रस्ट निरंतर वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक यांसह विविध प्रकारचे चांगले उपक्रम राबवित असतात असे डॉ. डहाळे म्हणाले. सुयश हेल्थ केअरचे डॉ. ऋतुजा, रितेश शिंदे, सौरभ अडसूळ, स्वप्नील पाटील, अजय कांबळे आदींनी तपासणी शिबिर दरम्यान अत्यावश्यक सेवा देण्याचे काम केले. अत्याधुनिक ATM मशीनद्वारे इसीजी, हिमोग्लोबिन, ब्लडप्रेशर, शुगर, वेट, बीएमआय, मसलमास, बोनमास, मेंटबॉलिक एज, फॅट फ्री वेट, बॉडी फॅट, सबकूटनेलस फॅट, स्पीओ२, प्लस टेंप्रेचर, हाईट, बॉडी वॉटर, स्केलटन मास, विस्करल फॅट आदी तपासणीचा लाभ ११३ रुग्णांनी घेतला. आरोग्य शिबिर यशस्वीतेसाठी निकेत जैन, सावन जैन, उदय डहाळे, अजय महाजन, जैनेंद्र जैन, नाना लांबोळे, नितेश महाजन, विलास जैन यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन प्रतीक जैन यांनी केले. तर वैद्यकीय क्षेत्रातील आणि उपस्थित मान्यवरांचे आभार श्रेयांस जैन यांनी मानले.