सोलापूर (वृत्तसंस्था) सोलापूर (Solapur) जिल्ह्यातही एक लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. सोलापुरातील ऍडोरा रुग्णालयात पहिल्यांदाच यशस्वीरित्या लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉ. शरण हिरेमठ यांनी ही किमया करून दाखवली आहे. दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर त्यांनी एका पुरुषाच महिलेमध्ये रूपांतर केलं आहे.
संबधित तरुणाच्या कुटुंबीयांच्या संमतीनंतर आणि मानसिकरोग तज्ञांच्या सल्ल्यानंतरच ही लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया केली असल्याची माहिती डॉ. शरण हिरेमठ यांनी दिली आहे. लिंग परिवर्तन करणाऱ्या तरुणाने त्यांची ओळख गुपित ठेवली असल्याने या तरुणाबाबत अधिक माहिती मिळून शकलेली नाही. त्यांची माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, सुरूवातीला फक्त विदेशात होणारी ही शस्त्रक्रिया आता भारतातही आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही होत असल्याने अनेक लिंग परिवर्तन करू पाहणाऱ्यांच्या अडचणींचा मार्ग सुकर झाला आहे.
शस्त्रक्रियेसाठी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च
या शस्त्रक्रियेसाठी साधारण एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती डॉ. शरण हिरेमठ यांनी दिली आहे. त्याचबरोबर लिंग परिवर्तनानंतर पुरूषातून महिलेमध्ये परिवर्तन झालेल्या महिलेला मुलाला जन्म देता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.