जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आज जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
माजी स्वातंत्र्य सैनिक यांच्या कार्याला आठवणींना उजाळा देऊन वारसदार यांचा सत्कार करण्यात आला यात १) स्वातंत्र सैनिक कै. नारायणराव दौलतराव सुर्वे रायपूर कंडारी ता. जळगाव यांचे वारस गोविंदराव नारायण सुर्वे २) स्वातंत्र्य सैनिक कै. गोपीलाल हिरालालजी भारतीया यांचे वारसदार रमेश गोपीलालजी भारतीया रा.पाचोरा ३)स्वातंत्र्य सैनिक कै. रामलाल बन्सीलाल काबरा यांचे वारस कैलास रामलाल काबरा रा.एरडोल ४) स्वातंत्र सैनिक कै. रामचंद्र बंडू जोशी यांचे वारस प्रकाश रामचंद्र जोशी नगरदेवळा यांचा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला.
यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी समवेत माजी महानगर अध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, शाम तायडे, जमील शेख, श्रीधर चौधरी, प्रदीप सोनवणे, नदीम काझी,मनोज चौधरी, राजस कोतवाल, कफिल अहमद, नितिन चौधरी, शशिकांत तायडे, जाकीर बागवान, योगेश देशमुख, जगदीश गाढे, विष्णू घोडेस्वार, डॉ. शोएब पटेल, अमजद पठाण, प्रा.संजय पाटील, मनोज वाणी, तुळशीराम सोनवणे, नितीन चौधरी, बबन गवळी, पी.जी.पाटील, कैलास महाजन, राजेंद्र श्रीनाथ, मीराबाई सोनवणे, सकिना तडवी, अमिना तडवी, योगिता शुक्ल, छाया कोरडे, कल्पना पाटील, अरुणा पाटील, महेंद्रसिंग पाटील, राहुल भालेराव, स्वप्निल साबळे, प्रमोद गुघे, गोकुळ चव्हाण, भाऊसाहेब शिरमाणे, बिपिन पाटील, प्रमोद गुघे, महेंद्र महाले, सुकदेव सोनवणे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.