भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळ व श्री संत गाडगे महाराज परिट धोबी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमान शहरातील कुठल्याही एका उड्डाण पुलास “श्री संत गाडगे महाराज” उड्डाणपुल असे नाव देण्यात यावे यासाठी दिनांक १७ डिसेंबर २०२० रोजी मा.उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
भुसावळ परिसरातुन हायवे नं.६ चे काम सुरु असुन ठिकठिकाणी उड्डाण पुल तयार केलेले आहेत. त्यापैकी कोणत्याही एका उड्डाण पुलास श्री संत गाडगे महाराज उड्डाणपुल असे नाव देण्यात यावे. श्री संत गाडगे महाराज हे राष्ट्रसंत व स्वच्छतेचे जनक होते. त्यांनी समाजाला अनेक चांगले संदेश दिलेले आहेत व त्यांच्या नावाने हा उड्डान पुल केल्यास त्यांच्या नावाचे स्मरण नेहमी होईल व त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव होईल. व सर्व लोकांना प्रोत्साहन मिळेल. या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळ व श्री संत गाडगे महाराज परिट धोबी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने मा.उपविभागीत अधिकारी रामसिंग सुलाने यांना देण्यात आले या निवेदनावर कैलास शेलोडे जिल्ह्याध्यक्ष, रमेश ठाकरे, योगेश बोडदे, बाळू शोलोडे, मनीष बाविस्कर, तुलसीदास येवलेकर, भिसन बाविस्कर, निलेश सोनवणे अशांच्या सह्या आहेत.