जळगाव (प्रतिनिधी) येथील एका १८ वर्षीय तरुणाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात कौनिन शेख जाहिद (वय १८, रा. दंगलग्रस्त कॉलनी घर नं ३७, जळगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, २ जून २०२२ रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कौनिन शेख यांना फ्लिपकार्ट कस्टमर केअरला आलेल्या पार्सलच्या केलेल्या तक्रारी संदर्भात फोन केला. या अज्ञात व्यक्तीने विश्वासात घेऊन कौनिन शेख याच्या आईच्या बँकेचे डिटेल्स मिळवले. त्यानंतर ३९ हजार ५०० रुपये वेळोवेळी काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि किशोर पवार हे करीत आहेत.