जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका खासगी फायनान्स कंपनीतील मॅनेजरला सोशल मीडियावर शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याच्या भूलथापा देत, सायबर भामट्यांनी १२ लाख ८२ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना दि. १३ ऑक्टोबर रोजी समोर आला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गुड्डू राजा नगरात संभाजी ढोमण माळी (वय ३५) हे शहरातील एका खासगी फायनान्स कंपनीत रिलेशनशीप मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर शेअर ट्रेडिंगचे रिल्सचे व्हिडिओ पाहून एका अनोळखी पेजला फॉलो केले. त्यानंतर, त्यांना ‘नोमुरा एलजीझेड पी८४’ नावाच्या व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. या ग्रुपची अॅडमीन नेहा अय्यर आणि सदस्य प्राजक्त सामंत यांनी माळी यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. या सायबर ठगांनी माळी यांना ‘नोमुईनसेक’ नावाचे एक अॅप डाऊनलोड करण्याची लिंक पाठवली. ‘नोमूर जीएसएक्स जेनकिन्स’ नावाच्या अनोळखी व्यक्तीने त्यांना हे अॅप वापरण्यास सांगितले.
आयपीओ खरेदीच्या नावावे उकळली रक्कम
त्यानंतर स्टॉक (आणि आयपीओ खरेदी करण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये माळी यांच्याकडून तब्बल १२ लाख ८२ हजार इतकी मोठी रक्कम ऑनलाईन स्वीकारली. गुंतवलेली रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याने माळी यांनी दि. १३ ऑक्टोबर, सोमवारी सायबर पोलिसांत फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभासी नफा दाखवित घातला गंडा
माळी यांनी हे अॅप डाऊनलोड करून त्यामध्ये आपला मोबाईल नंबर, पासवर्ड आणि २८१८ हा इन्व्हिटेशन कोड टाकला. तसेच आपले नाव, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि त्या कागदपत्रांचे फोटो अपलोड करून नोंदणी केली. माळी यांनी सुरुवातीला ५ हजार रुपये गुंतवणूक केली. त्यावर या अॅपमध्ये १०१ रुपये नफा झाल्याचे आभासी स्वरूपात दाखवून संशयितांनी त्यांचा विश्वास संपादन
















